जलवाहिनी में रिसाव से छत्रपति संभाजीनगर की जलापूर्ति प्रभावित, मरम्मत जारी
[ सिटिज़न सारांश ] छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीजी अप्लायन्सेस कंपनी पैठण रोड चितेगाव येथे आज संध्याकाळी 6.10 वाजता 1219 मी मी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व पाईप मधून अचानक गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्वरित फारोळा येथून पंपिंग बंद करण्यात आलेली असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे. तथापि जलवाहिनीवरील पाण्याचा दाब व पाण्याचा निचरा करण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सदरील दुरुस्तीचे काम सकाळी पूर्ण होईल. यादरम्यान 700 मीमी व 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनी द्वारे येणारे पाणी सिडको एक्सप्रेस जलवाहिनीद्वारे सिडको एन-5 येथे वळविण्यात आलेले आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहर परिसराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येईल. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
What's Your Reaction?